नोएडा – मागील अनेक दिवसांपासून देशात लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे घराबाहेर जाणंही अशक्य होतं. आता करोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरली आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडत, आहेत. क्रिकेट खेळत आहेत. मात्र नोएडात क्रिकेट खेळाताना दोघांचा मृत्यू झाला. हरवलेला बॉल शोधण्यासाठी गेलेले दोघेही मृत अवस्थेत आढळून आले.
क्रिकेटचा बॉल सीव्हर प्लाटंच्या टँकमध्ये गेला होता. त्यामुळे तरुण बॉल शोधण्यासाठी सीवर टँकमध्ये उतरले. मात्र सीवरमधील गॅसमुळे चार तरुण तेथेच बेशुद्ध झाले. दुर्देवाने या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. सीव्हर प्लांटमध्ये उतरलेल्या चौघांपैकी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त माहिती अशी, चार तरुण आज सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडले. काही वेळानंतर चेंडू सीवर प्लांटच्या टँकमध्ये जाऊन अडकला. त्यामुळे टँकमध्ये उतरण्याच्या तयारीत होते. त्यावेळी टँक ऑपरेटरने तरुणांना अडवलं. मात्र त्यांनी ऐकलं नाही. टँकमध्ये गेलेले तरुण एकापाठोपाठ बेशुद्ध झाले.
दरम्यान, शेजारी उभा असलेला रिक्षा चालक आणि ऑपरेटरने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर चौघा तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं.