पुणे – सिंगापूरसाठी पुण्यातून आता चार नव्हे तर सहा दिवस विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यामुळे येत्या १५ डिसेंबरपासून विमान कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिंगापूरला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुण्यातून विस्तार कंपनीने पुणे सिंगापूर विमानसेवा गेल्या वर्षी सुरू केली होती. ती आठवड्यातून फक्त चार दिवसच होती. १५ डिसेंबरपासून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार आणि रविवार असे सहा दिवस पुणे सिंगापूर विमान सेवा सुरू राहणार आहे. सध्याच्या पुणे सिंगापूर विमान सेवाला खूपच चांगला प्रतिसाद असून त्यामुळेच आठवड्यातून दोन दिवस सेवा वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विस्ताराच्या वतीने देण्यात आली.