वाघोली ; आव्हाळवाडी तालुका हवेली या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बदामबाई आव्हाळे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच नितीन घोलप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत बदामबाई आव्हाळे यांच्या सह प्रशांत सातव यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र सातव यांनी माघार घेतल्याने आव्हाळे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
माजी पंचायत समिती सभापती नारायण आव्हाळे यांच्या खंडोबा प्रगती पॅनलच्या सदस्य आहेत..या पॅनलने सरपंच पदासह आठ जागा मिळविल्याने उपसरपंच त्यांच्याच पॅनलचा होणार हे निश्चित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक अतुल कोहिनकर यांनी कामकाज पाहिले. यावेळी पॅनलचे सर्व पदाधिकारी,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.