पुणे – बसमधून प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा कंडक्टरने विनयभंग केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी प्रशांत किसन गोडगे( 30,रा.कात्रज-कोंढवा रस्ता) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी 17 वर्षीय मुलगी ही स्वारगेट ते पुणे बसने प्रवास करत होती. बस वेस्टएंड थिएटर येथे आली असता कंडक्टर प्रशांत तीला खेटून उभा राहिला. यावेळी तीने तुला उभे रहायला जागा नाही का ? असे विचारले.
मात्र तो आणखीनच खेटून उभा राहिला. याची तीने तिकीट चेकरकडे तक्रार केली असता, त्याने डोळे वटारुण तीन वेळा तीच्या कमरेला हात लावला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत. फिर्यादी मुलगी ही विद्यार्थीनी असून ती नियमीत बसने प्रवास करते.