नांदेड सिटी डेस्टीनेशन सेंटर मॉलमधील ब्लु बेरी स्पा मसाज सेंटरवर पुणे ग्रामीण पोलिसांचे पथकाने छापा टाकून वेश्या व्यवसाय करणा-या एक परदेशी व दोन स्थानिक तरुणींची सुटका केली.
खडकवासला : नांदेड सिटी डेस्टीनेशन सेंटर मॉलमधील ब्लु बेरी स्पा मसाज सेंटरवर पुणे ग्रामीण पोलिसांचे पथकाने छापा टाकून वेश्या व्यवसाय करणा-या एक परदेशी व दोन स्थानिक तरुणींची सुटका केली. मसाज सेंटर मालक व व्यवस्थापक असे चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विजयसिंह चौहान यांनी दिली.
पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी पोलिस निरीक्षक विजयसिंह चौहान, पोलिस उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर घुले, सहा. पोलिस निरीक्षक महेश गायकवाड, जितेंद्र शेवाळे, महिला पोलिस हवालदार ज्योती बांभळे, पूनम कांबळे, सिमा जगताप यांचे पथक नेमून त्यांना अवैध वेश्याव्यवसाय धंदयाची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते.
उच्चभ्रू परीसरात असलेल्या मसाज स्पा सेंटरवर छापा; एका मॉडेलसह…
२ सप्टेंबर २०२२ रोजी हवेली पोलिस स्टेशनच्या हद्दीत सदर पथक सिंहगड रोड नांदेड सिटी मेन गेट येथे येवून गोपनीय माहिती काढत असताना पोलिस उपनिरीक्षक सुधीर घुले यांना नांदेड सिटी येथील डेस्टीनेशन सेंटर मॉलचे पहिला मजल्यावरील शॉप नं. एफ-६४ या ठिकाणी ब्लु बेरी स्पा मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली परदेशी तरुणीकडून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे खात्री करणेसाठी पोलिस पथकाने मसाज सेंटरवरील रेडचे नियोजन करुन त्या ठिकाणी बनावट गि-हाईक पाठविला. तेथे मसाजच्या नावाखाली एक्स्ट्रा सर्व्हीसचे नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून दुपारी ०३.०० वा. चे सुमारास छापा टाकला. त्यावेळी सदर ठिकाणी मसाज सेंटर चालविणारा एक मालक, दोघे मॅनेजर तसेच एक परदेशी व दोन स्थानिक पिडीत तरुणी मिळून आल्या.
मसाज सेंटरचे मालक १) मुंजा रामदास शिंदे (वय ३१ रा. वडगाव ता. हवेली जि. पुणे), २) योगेश पवार (रा.नांदेड गाव ता. हवेली जि. पुणे) मॅनेजर ३) अथर्व प्रशांत उभे (वय १९ रा. धायरी, बेनकरवस्ती ता. हवेली जि. पुणे) व महिला मॅनेजर ४) ज्योती विपुल वाळींबे (वय ३० रा.न-हे, ता. हवेली जि. पुणे) हे सदर पीडित युवतींना जादा पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करुन मसाज सेंटर स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे निष्पन्न झालेने त्या चौघांचेविरुध्द हवेली पोलिस स्टेशनला अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर मोटारीचा पाठलाग करत केले फायरींग अन्…
मसाज सेंटर येथे मिळून आलेल्या पीडित ३ तरुणींना महिला सुधार गृह येथे पाठविण्यात आलेले आहे. तेथे छाप्याचे वेळी मिळून आलेले मसाज सेंटरचे मालक मुंजा रामदास शिंदे, मॅनेजर अथर्व प्रशांत उभे व ज्योती विपुल वाळींबे यांना सदर गुन्हयामध्ये अटक करण्यात आलेली असून मुख्य आरोपी योगेश पवार याचा शोध चालू आहे. अटक आरोपींची पोलिस कस्टडी रिमांड घेणेकामी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे.
सदरची कारवाई ही पुणे जिल्हयाचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयसिंह चौहान, पोलिस उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर घुले, सहा. पोलिस निरीक्षक महेश गायकवाड, जितेंद्र शेवाळे, महिला हवालदार ज्योती बांभळे, पूनम कांबळे, सिमा जगताप यांचे पथकाने केलेली आहे. पुणे ग्रामीण जिल्हयात अशा प्रकारचे वेश्या व्यवसाय व इतर अवैध धंदयावर कडक कारवाई करणेबाबत पुणे जिल्हयाचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आदेश दिले आहेत.