पुणे – बासमती तांदळाची विक्रमी निर्यात

तीन वर्षांत तांदळाची निर्यात सारखीच : यंदा भाववाढ झाल्यामुळे मिळाले जास्त चलन

पुणे – सुवासिक बासमती तांदळाची एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीत विक्रमी 30 हजार कोटी रुपयांची निर्यात झाल्याची माहिती जयराज आणि कंपनीचे संचालक आणि तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी दिली आहे. डॉलरचे वाढलेले भाव आणि केंद्र सरकारने भाताच्या वाढविलेल्या किमान आधारभूत किंमतीमुळे बासमतीच्या भावात 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यामुळे बासमतीच्या निर्यातीच्या रक्कमेमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बासमती तांदळाच्या निर्यातीचे भाव मागील वर्षी (2017-18) 65 हजार रुपये प्रतिटन होते. त्यामध्ये साधारण 14 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन सन 2018-19 मध्ये 74 हजार रुपये प्रतिटन इतके राहिले. मागील आर्थिक वर्षात सन 2017-18 मध्ये 1121 आणि बासमती भाताचे भाव 33 ते 35 हजार रुपये प्रतिटन इतके होते. ते भाव सन 2018-19 मध्ये 35 ते 38 हजार रुपये प्रतिटन असे राहिले.

याविषयी शहा म्हणाले, मागील तीन वर्षे सन 2016-17, 2017-18 आणि 2018-19 मध्ये बासमती तांदळाची निर्यात 40 लाख टन प्रतिवर्ष होत आहे. तांदूळ निर्यातीच्या इतिहासात सर्वप्रथम सन 2013-14 मध्ये दुष्काळ सदृश संकटे असतानासुद्धा आर्थिक तेजी येऊन 40 लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली होती. रुपयांत बघायचे झाल्यास ती आजवरची विक्रमी 29 हजार कोटी रुपयांची झाली होती. त्यानंतर सन 2018-19 मध्ये बासमती तांदळाच्या निर्यातीला सर्वाधिक भाव निघून 30 हजार कोटी रुपयांची विक्रमी निर्यात झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.