कारवाई चुकविण्यासाठी पळालेल्या रिक्षाला अपघात

5 प्रवासी जखमी; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर – रिक्षात फ्रंट शीट घेऊन अवैध प्रवाशी वाहतूक करताना पोलिसांची कारवाई चुकविण्यासाठी पळालेल्या रिक्षाचा अपघात झाला. घटनेत 5 प्रवाशी जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना प्रेमदन चौकाजवळ घडली. रिक्षा चालक शुभम राजेंद्र आठरे (वय-22 रा. तवलेनगर) याच्या विरोधात शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत प्रवाशी अक्षय तरटे, प्रशांत साबळे, सुजित खामकर, मंगेश आम्ले, प्रतीक वाळके हे जखमी झाले आहेत.

शहर वाहतूक शाखेच्या वतीने दोन दिवसापासून नियमबाह्य रिक्षा वाहतुकीवर कारवाई सुरू आहे. यात परवाना नसणे, परमीट नसणे, फ्रंट शिट, जादा प्रवाशी बसविणे या प्रकारचा समावेश आहे. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे व कर्मचारी गवळी व ठोकळ हे सरकारी वाहनातून कारवाईसाठी नगर-सावेडी व एमआयडीसी परिसरात पेट्रोलींग करून प्रेमदन चौकाकडे येत असताना त्याची सरकारी गाडी प्रेमदान चौकात थांबली.

याचा दरम्यान शहरातून एमआयडीसीकडे शुभम आठरे हा रिक्षा (एम.एच.16. सी. ई. 7374) फ्रन सीटवर प्रवाशी घेऊन जात असताना त्याला वाहतूक शाखेची गाडी दिसली. त्याने फ्रंट सिटाची कारवाई टाळण्यासाठी रिक्षा प्रोफेसर कॉलनीकडील रस्त्याकडे वाळवून क्रिस्टल हॉटेल शेजारील बोळीत भरधाव घेऊन पळ काढला. तो तेथून लॉर्ड बिशप वसाहतीत घुसला. रस्ताचा अंदाज न आल्याने तो सगळे गल्लीतील असलेली दुचाकीवर धडकला. यामध्ये 5 जण जखमी झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.