यवत :- दौंड तालुक्यातील बोरभडक येथे नववीतील विद्यार्थिनीला आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात इस्माईल शब्बीर सय्यद (रा.बोरीभडक चंदनवाडी ता.दौंड,मुळ रा.हागलुर ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद) याच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बोरभडक येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. नराधम आरोपी हा पिडीत मुलीच्या घराशेजारी राहत होता. त्याचा फायदा घेत आरोपी इस्माईल सय्यद याने पीडित मुलीशी ओळख होती. तो नराधम घराशेजारी राहत असल्यामुळे त्याचे पीडितेच्या घरी अधून मधून येणे जाणे असल्याने त्याने याचा फायदा घेत या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत आरोपी याने जुलै महिन्यात पीडित मुलगी घरामध्ये एकटे असताना घरात घुसून मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. पीडित मुलगी पूर्णपणे घाबरलेली असल्याने तिने ही बाब कोणालाही सांगितली नाही. परंतु नराधम आरोपी वारंवार पीडित मुलीवर घरी कोणी नसताना ते घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवत होता.
काल मंगळवार (दि.८) पीडित मुलगी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी आल्यानंतर आरोपी इस्माईलयाने घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला मात्र पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने आरोपीने तिचे तोंड दाबून चाकूचा धाक दाखवत शारीरिक संबंध ठेवले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेला होता.
याप्रकरणी पीडित मुलगी आणि कुटुंबीय पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत असताना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन,अमित कांचन, बोरीभडकचे उपसरपंच प्रवीण खेडेकर, मा.उपसरपंच विकास अतकिरे यांनी पीडितेला आणि कुटुंबाला धीर देत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ यवत पोलीसांनी आरोपीस अटक केली.
त्या नराधामावर यवत पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, शस्त्र अधिनियम,अनुसूचित जाती जमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दौंड पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मटाले करीत आहेत.