खडकवासला(प्रतिनिधी) – सिंहगड किल्ला टिळक बंगल्याजवळ तोफेच्या पॉईंट जवळ पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन पर्यटकांनी मोहोळाला दगड मारल्याची माहिती समोर येत आहे. यात मधमाशांनी पर्यटकांना चावा घेऊन जखमी केले आहे.
मधमाशांचा हा हल्ला इतका तीव्र होता की, अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
सकाळी काही तरुणांवर मधमाशांनी हल्ला केल्यानंतर त्या परिसरात कोणी जाऊ नये म्हणून कर्मचारी तैनात केले होते. असे असताना पुन्हा त्या परिसरात मध्ये ही घटना घडली असता तोफेचा पॉईंट परिसरात कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचना पुन्हा देण्यात आल्या आहेत.
– बाळासाहेब जिवडे ,वनरक्षक सिंहगड
गावातील काही नागरिकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जात जखमी पर्यटकांच्या भेटी घेतल्या. यावेळी संबंधित कोणत्याही विभागाची मदत मिळाली नसून पर्यटकांनी नाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.