पुणे – थकबाकीदारांना ‘प्रिपेड वीजमीटर’ शॉक

पुणे – थकबाकीदारांचा टक्‍का कमी करणे, वीज गळती आणि वीजचोरी रोखण्यासाठी महावितरण प्रशासनाकडून “प्रिपेड वीजमीटर’ घेणे सक्‍तीचे करण्यात येणार आहे. शिवाय, शासकीय कार्यालयांची थकबाकी कमी करण्यासाठी त्यांनाही अशा पद्धतीच्या मीटरची सक्ती करण्यात येणार आहे. येत्या जून महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

वीज ग्राहकांकडे असलेला थकबाकीचा टक्‍का दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या शेतीपंपाच्या ग्राहकांकडे तब्बल 24 हजार कोटी रुपयांची थकबाकी अडकली आहे. त्याशिवाय घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडेही कोट्यवधींची थकबाकी अडकली आहे. त्यामुळे प्रशासनाचा आर्थिक डोलारा अधिकच कोसळत चालला आहे. शिवाय, वीजचोरी आणि वीजगळती रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यामध्ये अपेक्षित यश आलेले नाही. त्यामुळे उत्पन्न आणि तोटा यांच्यातील तफावत वाढतच आहे.

त्यामुळे हा गुंता सोडविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून थकबाकीदार ग्राहकांना प्रिपेड वीजमीटर सक्‍तीचे करण्यात येणार आहे. त्यानुसार अशा थकबाकीदार ग्राहकांची यादी तयार करण्याच्या सूचना मुख्य कार्यालयाच्या वतीने सर्व परिमंडलांना देण्यात आल्या आहेत. ही यादी तयार झाल्यानंतर संबंधित ग्राहकांना हे प्रिपेड वीजमीटर देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.