ताडे, खेतमाळीस, शिंदेंवर शिवसेनेची धुरा

श्रीगोंदा  – शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते नंदकुमार ताडे, संतोष खेतमाळीस व माजी सरपंच संतोष शिंदे यांच्या खांद्यावर शिवसेनेची धुरा पुन्हा एकदा सोपविण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी या निष्ठावंतांना न्याय देत त्यांची सेनेच्या पदाधिकारीपदी निवड केली आहे.

ज्येष्ठ नेते नंदकुमार ताडे यांची तालुका संघटकपदी, तर संतोष खेतमाळीस यांची श्रीगोंदे शहरप्रमुखपदी, तर माजी सरपंच संतोष शिंदे यांची तालुका उपप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, विधानसभा संपर्कप्रमुख उत्तमराव साबळे, उप जिल्हाप्रमुख गणेश शेळके यांच्या उपस्थितीत या निवडी पार पडल्या. घनश्‍याम शेलार हे शिवसेनेत असताना या निष्ठवंतांना पदापासून दूर ठेवण्यात आले होते. मात्र अडचणीच्या काळात वेळोवेळी पक्षाची ताकद खेतमाळीस, ताडे व शिंदे यांनी जिवंत ठेवली. याचेच फळ म्हणून पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी देत त्यांचा सन्मान केला. या निवडीनंतर निष्ठावंतांना अखेर न्याय मिळाला, अशी भावना शिवसैनिकांनी बोलवून दाखविली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.