मांडुळ तस्करीत पुण्यातील पोलिसाचा सहभाग, येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे- मांडूळ तस्करी प्रकरणात पुणे शहर पोलीस दलाच्या चृतृ:श्रृंगी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यासह नवी मुंबईतील सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे पुणे शहरातील पोलीस कर्मचारी ऑन ड्युटी असताना कोणालाही न सांगता गेला होता. मांडूळ विक्री व्यवहारात वनविभागाने केलेल्या कारवाईत त्याला पकडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

सहायक निरीक्षक विश्वास बाळासाहेब चव्हाण आणि पोलीस कर्मचारी दीपक गोवर्धन धाबेकर गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी या दोन पोलिसांसह 17 जणांविरोधात नाशिक ग्रामीणमधील येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहन भिका पवार (वनपाल, राजापुर) यांनी फिर्याद दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.