पुणे – पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मास्कमध्ये इलेक्ट्रिक यंत्र बसवून पेपर सोडविणाऱ्या परीक्षार्थींना उत्तरे सांगणाऱ्या औरंगाबाद शहर दलातील पोलीस अंमलदारासह दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी सुनावली. त्या दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.
राहुल उत्तम गायकवाड (वय 33, रा. औरंगाबाद) असे या अंमलदाराचे नाव आहे. त्याच्यासह गणेश रामभाऊ वैद्य (वय 25, रा. धोंदलगाव, वैजापूर, औरंगाबाद) यालादेखील अटक केली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी दोघांना अटक केली आहे. याबाबत पोलीस नाईक शशिकांत यशवंत देवकांत यांनी फिर्याद दिली आहे. 19 नोव्हेंबर 2021 रोजी हिंजवडी परिसरातील ब्ल्युरीज पब्लिक स्कूलमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता