पुणे : पाऊस, रस्त्यावर खड्डे आणि वाहतूक कोंडी ही कोथरूडकरांची दिनचर्या झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या या खड्डयामुळे कोथरूड भागातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रस्त्यावर पडलेल्या खड्डयात पुणे मनपा लिहलेल्या कागदी होडया सोडत अभिनव आंदोलन करण्यात आले. तसेच महापालिकेने तातडीनं खड्डे दुरूती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांच्यासह विभाग सचिव राजेंद्र वेडेपाटील, शहरसंघटक शैलेश जोशी, उपविभाग अध्यक्ष रमेश उभे, सचिन विप्र,गणेश शिंदे,पांडुरंग सुतार, शाखा अध्यक्ष विराज डाकवे,किरण उभे, शुभम गुजर, किरण जोशी, ज्ञानेश्वर काकडे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.