पुणे, दि. 16 -निवासी मिळकतकर तसेच “गवनि’ सेवा शुल्क भरणाऱ्या शहराच्या हद्दीतील नागरिकांच्या कुटुंबासाठी पुणे महापालिकेतर्फे पं. दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना राबविण्यात येते.
या योजनेंतर्गत मिळकतधारकाचा किंवा त्याच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपये, मिळकतधारकावर अवलंबून असलेल्या 23 वर्षांखालील पहिल्या दोन अपत्यांपैकी कोणत्याही एका अपत्याचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला अडीच लाख रुपये मिळतात. मिळकतधारकाच्या आई किंवा वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यास अडीच लाख रुपये, कुटुंबातील व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास कुटुंबातील सर्वांना मिळून किंवा एका व्यक्तीला एका वर्षामध्ये जास्तीत जास्त एक लाख रुपये मिळतात. जखमी झाल्यास दवाखान्यात असतानाचा औषधांचा आणि दवाखान्याचा खर्च मिळतो. यातील कोणताही लाभ घ्यायचा असेल तर संबंधित नागरिक निवासी मिळकतकरधारक अथवा “गवनि’ सेवा शुल्क भरणारा असावा.
आवश्यक कागदपत्रे…
पोलीस एफआयआर
शवविच्छेदन अहवाल
पोलीस पंचनामा व इन्क्वेस्ट रिपोर्ट
मृत्यू दाखला
मिळकत कर, गवनि सेवा शुल्क भरल्याची पावती
मृत्यू झाला त्या व्यक्तीचे आधार, पॅन कार्ड
वारसदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड
रेशन कार्ड
इंडेम्निटी बॉण्ड (200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केलेले)
क्लेम मिळण्यासाठीचा अर्ज
अशी मिळणार रक्कम
रुग्णवाहिकेसाठी रुपये
तीन हजार रुपये
अपघाताने पूर्णतः कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये
अपघाताने अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ससून हॉस्पिटल/ आयआरडीए यांनी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार मूळ विमा रकमेच्या तुलनेत भरपाई मिळणार.
दवाखान्यात दाखल केल्यास विमा दाव्यासाठी लागणारी कागदपत्रे
पोलीस एफआयआर
एमएलसी रिपोर्ट
मिळकतकर, गवनि सेवा शुल्क भरल्याची पावती
डीस्चार्ज समरी आणि आंतररुग्ण केस पेपर
एक्स रे रिपोर्ट
पॅथॉलॉजिकल रिपोर्ट
दवाखान्याचे बिल
भरल्याची पावती
डॉक्टरांचे प्रिस्क्रिशन आणि मेडिकलची बिले
अपघात झाला त्या व्यक्तीचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड
क्लेम मिळण्यासाठीचा अर्ज
क्लेमच्या गरजेनुसार लागणारे इतर काही कागदपत्रे
अर्ज येथे करावा
पुणे महापालिका, आरोग्य विभाग, रूम नं. 324, मुख्य इमारत, तिसरा मजला, शिवाजी नगर, पुणे,
फोन 020-25501220
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ली., शिवम कॉम्प्लेक्स, पहिला मजला, शंकर महाराज मठाजवळ, पुणे-सोलापूर रोड, हडपसर पुणे फोन 020-26820916 /26820547