पुणे – एका अभियांत्रीकी महाविद्यालयातील तरुणाला ग्राईंडर ऍपवरील दोस्ती भलतीच महागात पडली आहे. त्याच्यावर तीन जणांनी अनैसर्गीक अत्याचार करुन ऑन लाईन पध्दतीने 29 हजार लूटले. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पिडीत तरुण हा 21 वर्षाचा आहे. त्याची ग्राईंडर ऍपवर आरोपींशी ओळख झाली होती. त्यांच्याशी चॅटींग झाल्यावर रविवारी सायंकाळी ससून रुग्णालयाच्या गेटवर भेटायचे ठरले.
तेथून तीघांनी त्याला फिरायला चल असे सांगून चारचाकी गाडीत भोसरी येथील निर्जनस्थळी नेले. तेथे आरोपींनी त्याच्या गळ्याला विळा लावून 28 हजार 500 रुपये वर्ग करण्यास सांगितले. यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला.
याची माहिती कोणाला दिल्यास ओळख उघड केली जाईल अशी धमकी देण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनय जाधव करत आहेत