पुणे – अत्याचारातून जन्मलेल्या मुलीला स्वत:चे नाव लावण्यासाठी अत्याचार करणाऱ्याने पिडीत महिलेकडून 12 लाखाची खंडणी उकळली. खंडणी दिल्यानंतरही मुलीला बाप म्हणून स्वत:चे नाव लावल्याने पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी संबंधीत आरोपीस चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. विरेश यशवंत म्हस्के (40,रा. गणेशनगर, वडगावशेरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पिडीत महिला विधवा असून तीला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. तर आरोपी विरेश हा तीचा नातेवाईक असल्याने त्यांच्यात ओळख होती. त्याने ओळखीचा फायदा घेत तीच्या नाष्टयात गुंगीचे औषध टाकून 2019 मध्ये तीच्याव अत्याचार केले. अत्याचाराचे चित्रण सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
दरम्यान विरेश पासून तीला एक मुलगी झाली. मुलगी झाल्याव वीरेशनच्या तीच्या नावापुढे पिडीतेच्या वडिलांचे नाव लावले. मात्र मुलीला वडिल म्हणून स्वत:चे नाव लावावे अशी मागणी तीने वीरेशकडे केली होती. त्याने यासाठी पिडीतेकडे 20 लाखाच्या खंडणीची मागणी केली. तीने कसे बसे पैसे जमा करुन त्याला 12 लाख रुपये दिले.
यानंतरही त्याने मुलीला बाप म्हणून स्वत:चे नाव दिले नाही. याप्रकरणी तक्रार दाखल होताच आरोपी विरेश खांदवे नगर परिसरात लपून बसला होता. त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, उपनिरीक्षक अरविंद कुमरे, दिलीप पालवे, अंमलदार सुहास निगडे, सचिन रणदिवे, अविनाश सकपाळ, श्रीकांत शेंडे, शिवाजी धांडे,
महेश नाणेकर, नामदेव गडदरे, श्रीकांत कोदरे, सुरज जाधव, शेखर शिंदे, सुभाष आव्हाड, विकास कदम, गणेश हांडगर यांनी केला. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संगीता काळे करत आहेत.