पुन्हा पुणे-नाशिक विमानसेवा सुरू होणार

पुणे – केंद्र सरकारच्या “उड्डान’ या योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेली पुणे-नाशिक विमानसेवा पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यान्वित होणार आहे. “अलायन्स एअर’ कंपनीच्या माध्यमातून 28 ऑक्‍टोबरपासून ही सेवा सुरू होणार आहे.

यापूर्वी डिसेंबर 2017 मध्ये पुणे-नाशिक मार्गावर उड्डान योजनेंतर्गत सेवा सुरू झाली होती. मात्र, पुणे-नाशिक उड्डाण मार्गावर विमानाच्या वेळांमध्ये अडचणी येत असल्याने योजनेला प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने मार्च 2018 मध्ये ही सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर, मागील दोन वर्षांत ही सेवा दोन वेळेला सुरू करून पुन्हा बंद करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.