कोंढवा, दि. 21 (प्रतिनिधी) -सोमवारी (दि.17) झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील ड्रेनेजलाइन विस्कळीत झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून विविध अडचणीमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. परिसरातील समस्या कायम आहेत. परंतु, याबाबत अधिकाऱ्यांकडून चालढकल करीत कामे केली जात असल्याचे नागरिकांनी सांगितल्यानंतर मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी महापालिका आधिकाऱ्यांना घोडा भेट देत कासवाच्या नव्हे तर घोड्याच्या गतीने परिसरात कामे करा, असा संदेश देत अनोखे आंदोलन केले.
महापालिका आधिकाऱ्यांनी योग्य काम करून नागरिकांचा दिवाळी सण आनंदी करावा, यासाठी सुसज्ज यंत्रणा कामाला लावावी, असे साईनाथ बाबर यांनी आवाहन केले आहे.