पुणे : आशानगर येथील पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन प्रसंगी काॅग्रेस आमदर रविंद्र धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी महापालिका अभियंता संघाच्या वतीने सोमवारी निषेस सभा घेण्यात आली.
महापालिका अधिकार्यांबाबत वारंवार हे प्रकार घडत असून ही पुण्याची संस्कृती नाही त्यामुळे नागरिकच याचे उत्तर देतील अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. अभियंता संघाचे कार्याध्यक्ष प्रशांंत वाघमारे, सचिव सुनील कदम सह सचिव संजय पोळ, खजिनदारर केदार साठे, उपाध्यक्ष मुकुंद बर्वे यांच्यासह, पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनीवास कंदूल, प्रकल्प विभागाचे श्रीनीवास बोनाला, अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप, नंदकिशोर जगताप यांच्यासह महापालिकेतील सर्व विभागांचे अभियंते उपस्थित होते.
स्वतंत्र सेल करण्याची मागणी
राजकीय कार्यकर्ते तसेच पदाधिकार्यांकडून महापालिका अधिकार्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करणे असे प्रकार घडत आहे. या प्रकरणी एकाटया अधिकार्याने पोलिसांमध्ये तक्रार दिल्यास उलट अधिकार्याला त्रास होतो. त्यामुळे, भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेच्या विधी विभागाच्या माध्यमातून सेल तयार करून त्यांच्या माध्यमातून पोलिसात तक्रार करण्यात यावी अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांनाही देण्यात आले तसेच, उद्घाटनाच्या कार्यक्रमाची जबाबदारी नगरसचिव विभागाकडे असून भविष्यात विभाग प्रमुखांवर हे काम दिले जाऊ नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली.