कोथरूड – देशभरातील मंदिरे आणि पुजास्थळांची स्वच्छता करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. त्यानुसार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड परिसरातील मृत्यूंजयश्वर मंदिरात महादेवांचे दर्शन घेऊन मंदिर व परिसराची साफसफाई केली.
यावेळी भाजपा कोथरुड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, शहर उपाध्यक्ष शाम देशपांडे, मंडल सरचिटणीस गिरीश खत्री, प्रा. अनुराधा एडके, दीपक पवार, निवडणूक सह प्रभारी नवनाथ जाधव, गिरीश भेलके, चिटणीस अमोल डांगे, माजी नगरसेवक जयंत भावे, ॲड. प्राची बगाटे, अजित जगताप, सुजाता जगताप, सागर जोगवडे, कुणाल तोंडे, चेतन धाडवे, सौरभ अथणीकर, व्यवस्थापक मृत्युंजय मंदिर नितीन शिंदे, जयंत देशपांडे यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या आगमनाने संपूर्ण देशात उत्साचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. आपली श्रद्धास्थाने म्हणजे मठ आणि मंदिरे आपले मानबिंदू आहेत. आपण आपल्या मनाच्या शुद्धीसाठी देव दर्शन करतो. त्यामुळे मंदिर परिसराची स्वच्छताही तितकीच पवित्र आहे. यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनानुसार मकर संक्रांतीपासून देशभरातील सर्व मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.