पुणे मेट्रोची खड्डे दुरुस्ती पाण्यात

पुणे – संततधार पावसाने मेट्रोचे काम सुरू असलेल्या कर्वे रस्त्यावर अवघ्या 24 तासांत पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्ते दुरूस्त केल्याचा मेट्रोचा दावा फोल ठरला असून कर्वे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खड्डे असल्याने वाहनचालकांना शुक्रवारी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. तर नळस्टॉप चौकातही खड्डे पडले आहेत.

कर्वेरस्ता, पौडरस्ता परिसरात ज्या भागात मेट्रोचे काम सुरू आहे तेथे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावलेला असल्याने मंगळवारपासूनच पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच, नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा ताण येत आहे. तसेच, एसएनडीटी महाविद्यालय ते स्वात्र्यंवीर सावरकर स्मारकापर्यंत रस्त्याची दोन्ही बाजूस अक्षरक्ष: चाळण झाली आहे. त्यामुळे बुधवारी मेट्रोकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह या रस्त्यांची पाहणी करून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यात सुमारे अडीचशेंहून अधिक खड्डे दुरुस्त केल्याचा दावा महामेट्रोने केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.