पुणे : सोमवारी रात्रीपर्यंत गुन्हे शाखेच्या पथकांनी विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात छापा टाकला. हैदरने गोदामात मिठाच्या पोत्यात मेफेड्रोन लपविले होते. पोलिसांनी 100 ते 200 पोत्यांची तपासणी केली. रात्री उशीरापर्यंत ही तपासणी सुरू होती.
पोलिसांनी हैदरने मिठाच्या पोत्यात लपविलेले 1100 कोटी मेफेड्रोन जप्त केले असून, जप्त केलेल्या 600 किलो मेफेड्रोनची किंमत 1100 कोटी रुपये असल्याची माहिती आयुक्त यांनी दिली. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आणि साथीदारांकडून ससून रूग्णालयाच्या परिसरात सव्वा दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ (मेफेड्रोन) जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या गुंडांसह तिघांना अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून, अमली पदार्थ विक्रीत आंतराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
वैभव उर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, रा. खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५)आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री हाेत असून, तस्करीत परदेशातील तस्कर सामील आहे. त्यानुसार आता अमली पदार्थ तस्करांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.