पुणे मॅरेथॉन 27 ऑक्‍टोबरला

पुणे – पुण्याला जागतिक क्रीडा क्षेत्राच्या नकाशावर आणण्यात ज्या स्पर्धेचा सर्वात मोठा वाटा होता ती पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन येत्या 27 ऑक्‍टोबरला होणार आहे.

यासाठी येत्या शुक्रवारपासून ऑनलाइन नाव नोंदणीला सुरुवात होत आहे. या मॅरेथॉनवेळी सर्व कोविड-19 नियमांचे पालन होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

स्पर्धेचे यंदा 35 वे वर्ष असून ही स्पर्धा देशाची प्रीमियम मॅरेथॉन स्पर्धा ठरणार आहे. 1983 सालापासून सर्व क्षेत्रातील हजारो धावपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. सामाजिक संदेश पसरवणे आणि निधी गोळा करणे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.