#IPL2021 | पटेल ठरला आयपीएलचा नवा हिरो

दुबई – आयपीएल स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर बेंगळुरुचे आव्हान संपुष्टात आले असले तरीही त्यांचा नवोदित गोलंदाज हर्षल पटेलचे अनेक समिक्षकांकडून कौतुक झाले आहे. हर्षलने आयपीएल स्पर्धेच्या एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेण्याच्या चेन्नई सुपर किंग्जच्या ड्‌वेन ब्राव्होच्या कामगिरीची बरोबरी केली आहे.

ब्राव्होने 2013 सालच्या मोसमात 32 गडी बाद केले होते. हर्षलने यंदाच्या मोसमात 15 सामन्यात एकूण 32 गडी बाद केले. यात 27 धावा देत 5 गडी बाद केल्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. हर्षलने याच मोसमात भारतीय गोलंदाजाने आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम साकार केला आहे.

मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहाच्या नावावर होता. बुमराहने 2020 सालच्या मोसमात 27 बळी घेतले होते. हर्षलने हैदराबादविरुद्ध तीन गडी बाद करत ही कामगिरी आपल्या नावावर केली. हर्षलने या स्पर्धेत आपल्या नावावर अनेक विक्रम जमा केले आहेत.

अनकॅप्ड गोलंदाजाने स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याची कामगिरी आपल्या नावावर केला आहे. या मोसमात पर्पल कॅपचा मानकरी हर्षल पटेलच ठरणार आहे. दुसऱ्या क्रमांकावर अवेश खान असून त्याच्या नावावर 23 बळी आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.