पुणे – पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीओ) कार्यक्षेत्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीसाठी वातानुकुलीत टॅक्सींच्या भाडेवाढ करण्यात आली आहे. जवळपास २० टक्क्यांची ही भाडेवाढ 1 जानेवारी 2024 पासून ही भाडेवाढ लागून करण्यात येत आहे. ही माहिती पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले.
प्राधिकरण कार्यक्षेत्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कुलकॅब वातानुकुलीत टॅक्सींच्या भाडेसुधारण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी बैठक देखील घेतली होती. खटूआ समितीच्या शिफारशीनुसार कुलकॅब/वातानुकुलित टॅक्सी करीता काळी-पिवळी टॅक्सी दराच्या २० टक्के भाडे वाढ देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
खटुआ समितीच्या अहवालास शासनाने २०२० रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्य केलेल्या काळी-पिवळी टॅक्सी भाडेनिश्चितीच्या सुत्रानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी २०२३ रोजीच्या बैठकीमध्ये काळी-पिवळी टॅक्सीसाठीचे भाडेदर निश्चित केले आहेत, असे संजीव भोर यांनी सांगितले.
अशी असेल नवी भाडेवाढ
पहिल्या दीड किलोमीटरसाठी आता ६ रुपयांची, तर त्या पुढील किलोमीटरसाठी ४ रुपयांनी वाढ केली आहे. परिणामी पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३१ रुपयांऐवजी आता ३७ रुपये तर त्यापुढील १ किलोमीटरसाठी २१ रुपयांऐवजी आता २५ रुपये मोजावे लागणार आहे. जवळपास २० टक्क्यांची ही भाडेवाढ आहे, असे आरटीओ अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले.
“पुणे आरटीएकडून प्रलंबित खटुवा समितीनुसार कॅबची भाडेदर निश्चिती ( भाडेवाढ नाही ) अखेर जाहीर करण्यात आली. त्यानुसार कॅब चालकांना भाडे देणे ओला, उबर सारख्या कंपन्यांना बंधनकारक आहे. जवळपास सर्वच कायदे धुडकावून लावणाऱ्या या कंपन्यांनी कॅब चालकांना त्यांच्या हक्काचे दर दिले नाही तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल.-” डॉ. केशव नाना क्षीरसागर, अध्यक्ष, इंडियन गिग वर्क