सर्वोकृष्ट शिक्षण संस्थांत पुणेच भारी!

पुणे – नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्कने (एनआयआरएफ) विद्यापीठ, महाविद्यालय, अभियांत्रिकी, लॉ, मेडिकल, मॅनेजमेंट गटातील सर्वोत्कृष्ट संस्थांची यादी केली. त्यात राज्यात पुण्याने आपले वर्चस्व यंदाही कायम ठेवले आहे. महाविद्यालय गटात फर्गसन, तर अभियांत्रिकी गटात सीओईपी राज्यात अव्वल ठरले आहेत. विशेष म्हणजे “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ऍन्ड रिसर्च’ अर्थात “आयसर’ने सर्वसाधारण गटात 23 वे स्थान मिळविले आहे.

सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठाच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दहावे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने 46 वे स्थान, सिम्बायोसिस विद्यापीठाने 56 वे, तर भारती विद्यापीठाने 62 वे पटकाविले आहे. महाविद्यालय गटात फर्गसन महाविद्यालयात देशात 27 वे क्रमांक मिळवित राज्यात अव्वल आला आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ इनफॉर्मेशन ऍन्ड बायोटेक्‍नालॉजीने 42 वे स्थान मिळविले आहे.

इंजिनिअरिंग गटात “कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे,’ अर्थात सीओईपीने 49 वे स्थान मिळवून राज्यात प्रथम स्थान पटकाविले. पुण्यातल डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्‍नॉलॉजीने 57 वे, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी 91 वे, भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाने 93 वे स्थान मिळविले आहे. तसेच, विधि गटात सिम्बायोसिस लॉ कॉलेजने 7 वे स्थान मिळविले आहे. मेडिकल गटात महाराष्ट्रातील एकमेव पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने 20 वे स्थान मिळविले आहे. मॅनेजमेंट गटात सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटने 20वे स्थान, तर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऍन्ड इंटरप्रिनिअरशिप डेव्हलमेंट या संस्थेने 55 वे स्थान मिळविले आहे.

फार्मसीमध्येही पुण्याचा झेंडा
फार्मसी गटात देशातील 75 पैकी पुण्यातील 5 महाविद्यालयाने स्थान मिळविले आहे. त्यात भारती विद्यापीठाचे पूना कॉलेज ऑफ फार्मसीने 16 वे स्थान, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस ऍन्ड रिसर्च 45 वे स्थान, माईर्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीने 60 वे स्थान, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीने 69 वे स्थान आणि प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीने 74 वे स्थान मिळविले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.