Pune : अंथरुणाला खिळून असलेल्यांचे लवकरच लसीकरण

पुणे –अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांची माहिती गोळा करून, त्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार आहे, असे मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.

बिनवडे यांनी आरोग्य विभागाची नुकतीच बैठक घेतली. त्यामध्ये सर्वसामान्यांच्या लसीकरणाशिवाय सहव्याधीग्रस्त, दिव्यांग यांच्याशिवाय रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी “वॅक्‍सिन ऑन व्हील्स’ या पर्यायांच्या विषयावरही चर्चा करण्यात आली.

अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांचे लसीकरण त्यांच्या घरी जाऊन करण्यात अनेक अडचणी आहेत. वेळेचाही विषय महत्त्वाचा आहे. एका व्यक्तीचे घरी जाऊन किंवा तो जेथे असेल तेथे लसीकरण केले तर त्याला कोणती “रिऍक्‍शन’ येत नाही ना, हे पाहण्यासाठी अर्धा तास त्यांना निरीक्षणाखाली ठेवावे लागणार. त्यामुळे सर्व टीमला एकाच रुग्णाजवळ थांबावे लागेल. त्यामुळे एका दिवसांत किती रुग्णांना लस देऊ शकता येईल, हे देखील पहावे लागणार आहे.

बिनवडे म्हणाले, “आधी नवा इमेल उघडून अशा रुग्णांची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यामध्ये डॉक्‍टरांच्या प्रमाणपत्राशिवाय, रुग्णाचे सहमती पत्रही घेतले जाणार आहे. तसेच माहिती संकलित झाल्यानंतर कोणत्या विभागात किती रुग्ण आहेत, त्याची माहिती एकत्रित केल्यानंतर या लसीकरणाचे नियोजन केले जाईल. याशिवाय यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. नर्सेस, डॉक्‍टर्स असोसिएशन्सकडून अशा रुग्णांची माहितीही संकलित केली जाणार आहे.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.