पुण्यात नवे करोनाबाधित पुन्हा तीनशेपार

पुणे – दिवसभरात 304 नव्या करोना बाधितांची नोंद करण्यात आली असून, 196 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. याशिवाय 7 जणांचा शहरात मृत्यू झाला असून, त्यात पुण्याबाहेरील तिघांचा समावेश आहे. आजपर्यंत 28 लाख 65 हजार 869 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. त्यातील 4 लाख 86 हजार 669 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर त्यातील 4 लाख 75 हजार 324 जण बरे झाले आहेत. तर 8 हजार 756 जणांचा मृत्यू झाला आहे.

सद्यस्थितीत 2,589 जण सक्रीय बाधित असून, त्यातील 226 जणांची प्रकृती गंभीर असून, 338 जणांना ऑक्‍सिजनवर ठेवण्यात आले आहे. दिवसभरात 7, 775 संशयितांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.