इंदापूर -शासनाकडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व इंदापूर तालुका शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघाचा जागा मागण्या संदर्भात प्रस्ताव प्रलंबित आहे. हा प्रस्ताव तात्काळ अंमलबजावणी होण्यासाठी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू. आगामी काळात या पत्रकार संघाला सहकार्य करणार असल्याची ग्वाही राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने शुक्रवारी (दि. 6) आयोजित पत्रकार दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मोहिते पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,
सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, प्रा. कृष्णाजी ताटे, आरपीआयचे शिवाजीराव मखरे, युवक नेते दीपक जाधव, दत्तात्रय घोगरे यांसह मान्यवर उपस्थित होते. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाषणाचे वाचन प्रा. विष्णू सुर्वे यांनी केले.
यावेळी शेकडो महिला सफाई कामगारांना पैठणी देत सन्मान केला पत्रकार, फोटोग्राफर वृत्तपत्र विक्रेते यांचा सन्मान व साहित्य वाटप केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते, मुख्य सचिव सागर शिंदे, कार्याध्यक्ष जावेद मुलाणी, उपाध्यक्ष संदीप सुतार, ज्येष्ठ पत्रकार तानाजीराव काळे, भीमराव आरडे, उदयसिंह जाधव देशमुख, संतोष आटोळे, बाळासाहेब कवळे,
तात्याराम पवार, श्रेयश नलवडे, विजय शिंदे, भारत शेंडगे, नानासाहेब चांदणे, प्रेमकुमार धर्माधिकारी, रामदास पवार, संतोष दहिदुले यांनी परिश्रम घेतले. जानकर म्हणाले की, माझ्या आमदार फंडातून लगेच दहा लाख रुपयांचा निधी पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी दिला जाईल. प्रास्ताविक नीलकंठ मोहिते यांनी केले तर तानाजीराव काळे यांनी आभार मानले.
इंदापूर तालुक्याच्या विकासाचे भागीदार
अनिकेत भरणे आदर्श सामाजिक कार्य, अंगद शहा युवा उद्योजक व प्रगतशील शेतकरी, धनंजय वैद्य आदर्श अभियंता, राजेंद्रबापू जगताप आदर्श बांधकाम व्यवसायिक, बाळासाहेब हरणावळ आदर्श शिक्षण संस्थाचालक, डॉ. एकनाथ चंदनशिवे आदर्श वैद्यकीय सेवा, शिवकुमार कुपल उत्कृष्ट अभियंता यांना राज्यस्तरीय पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
पत्रकारांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध
सामाजिक जाण आणि भान याची शिकवण खऱ्या अर्थाने पत्रकार संघाच्या माध्यमातून कळते आहे. शासनाच्या माध्यमातून व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून इंदापूर या तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार भवन उभारण्यासाठी पाहिजे ते योगदान दिले जाईल, असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.