मंचर -आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना वाऱ्यावर सोडून देणाऱ्या मुलगा आणि सुनेवर पारगाव (ता. आंबेगाव) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद एकनाथ वळसे यांनी दिली असून, ही घटना निरगुडसर येथे घडली आहे. निरगुडसर वळसेमळा (ता. आंबेगाव) येथील हनुमंत एकनाथ वळसे आणि
सुनीता हनुमंत वळसे यांनी फिर्यादी एकनाथ वळसे आणि त्यांची पत्नी अनुसया वळसे यांना सांभाळण्याबाबत लेखी दिलेले असूनही घरातून बाहेर काढले आहे. मुलाने मुंबई येथे खोली घेण्यासाठी आणि निरगुडसर येथे घर बांधण्यासाठी एकनाथ वळसे यांच्याकडून 1 लाख 35 हजार रुपये घेऊन ते परत न करता दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.