शिक्रापूर -येथील चाकण चौक परिसरात दोघे मित्र उभे असताना अनोळखी युवकाने त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत त्याच्या जवळील पिस्तूलमधून गोळीबार केला. घडलेल्या घटनेबाबत रोहन राकेश पाठक (वय 23, रा. पाटवस्ती शिक्रापूर) यांनी फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अनोळखी युवकावर गुन्हा दाखल केला आहे.
चाकण चौक परिसरात रोहन पाठक व अजय चव्हाण हे दोघे उभे एक युवक दुचाकीहून तेथे आला त्याने दोघांच्या डोळ्यावर दुचाकीची लाईट मारून शिवीगाळ, दमदाटी करत अचानक कमरेला लावलेले पिस्तूल काढून रोहनच्या दिशेने रोखले.
हवेत गोळीबार करत पुन्हा पिस्तूल रोहनच्या डोक्याला लावून निघून जा, नाहीतर गोळीच घालीन अशी धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहायक निरीक्षक वैभव पवार, रणजीत पठारे, हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, आत्माराम तळोले, मिलिंद देवरे, पोलीस शिपाई किशोर शिवणकर, जयदीप देवकर, अंकुश चौधरी यांनी त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली.