बारामती – शरयू फाउंडेशन तसेच बारामती रनर्स ग्रुपच्या वतीने बारामती शहरात आयोजित करण्यात आलेल्या हाफ मॅरेथॉन 2023 ला उदंड प्रतिसाद मिळाला. 2000 हून अधिक स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये धावले. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. केनियातील चार स्पर्धक स्पर्धेत धावले. खुला गटात 21 किमी (पुरुष) मध्ये जेम्स कोरीर (केनिया) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
शहरातील भिगवण रस्त्यावरून कटफळ चौकापर्यंत हे मॅरेथॉन आयोजित करण्यात आले होते. 21 किलोमीटर 10 व 3 किलोमीटरमध्ये स्पर्धा पार पडली. एमईएस हायस्कूल येथून स्पर्धेला सकाळी सहा वाजता सुरुवात झाली. देशातील मध्य प्रदेश गुजरात, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब राज्यातील तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले. केनिया देशातील चार स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. बारामतीत प्रथमच हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. शरयू फाउंडेशन फाउंडेशन आयोजित केलेल्या मॅरेथॉनला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, उद्योग समूहाचे चेअरमन श्रीनिवास पवार, शरयू फाउंडेशनच्या शर्मिला पवार, आंतरराष्ट्रीय धावपटू सुधा सिंग, ललिता बाबर, सिने कलाकार अशोक समर्थ, आयर्न मॅन दशरथ जाधव, शिवाजी काळे आदी मान्यवरांसह बारामती रनर्स ग्रुपचे डॉ. प्रेमेन्द्र देवकाते, ऍड. अमोल वाबळे, सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
मॅरेथॉन स्पर्धा विजेते-
खुला गट 21 किमी (पुरुष)- जेम्स कोरीर (केनिया) प्रथम, प्रवीण कांबळे – द्वितीय, सुनील कुमार – तृतीय, सुरजीत रामा राजभर – चतुर्थ, अनंत गावकर – पंचम महिला- ख्रिस्तीने कांबू म्ुयंगा- प्रथम, ब्रिगिड किमतवाय – द्वितीय, शिवानी चौरासिया- तृतीय, समीक्षा खरे – चतुर्थ, नेहा सिंग – पंचम. खुला गट 10 किमी (पुरुष) – शुभम सिंधू – प्रथम, धीरज यादव – द्वितीय सजल सावंत – तृतीय (महिला)- शाली धर्मा – प्रथम,
ऋतुजा कांबळे – द्वितीय, गायत्री चौधरी – तृतीय 21 किमी वयोगट 35-55 (पुरुष)- रविराज कोंडीकीरे- प्रथम, सुनील शिवाने – द्वितीय तानाजी नलवडे – तृतीय (महिला)- रश्मी सातव – प्रथम, अपर्णा प्रभुदेसाई – द्वितीय, अलमास मुलाणी – तृतीय 21 किमी वयोगट 55+ पुरुष- पांडुरंग चौगुले – प्रथम, संजय पाटील – द्वितीय, केशव मोटे – तृतीय (महिला)- दुर्गा शील – प्रथम, विन्फ्रेन्ड फोन्सेका – द्वितीय, उषा पाटील – तृतीय.