रांजणगाव गणपती -हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. लंडन येथे शिक्षणासाठी गेलेल्या संग्राम शेवाळे यांनी त्यांच्या मित्रपरिवारासोबत लंडन शहरातील संसद चौकात भारतीय विद्यार्थी व इतर देशातील विद्यार्थ्यांसोबत मिळून शिवजयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी जय शिवराय, आदी घोषणांनी संसदभवन परिसर दणाणून सोडले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य संपूर्ण जगात परिचित आहे. आपल्या युद्धकला आणि सर्वसमावेशक प्रशासकीय नैपुण्यामुळे शिवाजी महाराज हे आदर्श राजे ठरले. लंडन शहरात आपली भारतीय संस्कृती जोपासत भारतातील अनेक राज्यातील विद्यार्थी हे ऍड. संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मानवंदना देण्यासाठी एकत्रित आले होते.
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी अनेक देशातील अभ्यासक भारतात येतात. हीच महाराष्ट्राची परंपरा आम्ही जोपासत शिवाजी महाराज यांना लंडन संसद चौकात वंदन केले, अशी माहिती ऍड. संग्राम शेवाळे यांनी दिली. यावेळी अनिकेत शहा, दीपक चटप, ऋषिकेश आंधळकर, विक्रांत कोकाटे, यश ढोले, इंद्रजित घनवट, युवक उपस्थित होते.