कात्रज – दक्षिण पुण्याचेद्वार असलेल्या कात्रजकडून पुणे शहरांमध्ये प्रवेश करताना कात्रज चौकापासून पुढे रस्त्याच्या दुतर्फा महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या पदपथ व सायकल ट्रॅक आणि त्याच्या बाजूला सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या शोवभिवंत झाडांमध्ये गवत व इतर झुडपे वाढल्याने रस्त्याची दुतर्फा बाजू विद्रूप दिसत आहे. याकडे महापालिकेच्या छाटणी विभागाचे दुर्लक्ष असल्याने येथे लावण्यात आलेली शोभेची झाडे करपून गेली आहेत.
स्वारगेट-सातारा रस्त्यावरील कात्रज चौक ते बालाजी नगर कदम प्लाझापर्यंत पदपथाच्या बाजूने सुशोभीकरणासाठी मोठा खर्च करण्यात आला. मात्र, या जागेवर सुशोभीकरणची नव्हे तर रानटी गवत लावले जात असल्याने ते लवकरात लवकर काढण्यात आले. पदपथावर चालणाऱ्यांनाही अडचण होत आहे. मुख्य रस्त्यावर आली आहे व त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्यांच्या फांद्या लागून अपघात होण्याची भीती व्यक्त नागरीक करत आहे. तेव्हा महापालिकेच्या प्रशासनामार्फत रस्त्याच्या शोभीकरणासाठी व झाडे लावण्याकरता मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो मात्र ती झाडे उगवून न येता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत व अन्य प्रकारची झाडे उगवल येत आहे.
धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयामार्फत सातारा स्वारगेट रस्त्यावरील पदपथ व गालीच्यातील गवत काढण्याचे काम करत असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र गवत व झाडांच्या फांद्या योग्यरित्या निघाल्या नसल्याचे नागरिकांवर सांगत आहेत.
महापालिका शहर स्वच्छ व सुशोभित करण्याचा प्रयत्न करत असताना अशा प्रकारे दक्षिण प्रवेशद्वार असलेल्या स्वारगेट सातारा रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूने गवत व झाडे वाढल्यामुळे विद्रूपिकरणात वाढ होत आहे.
हा परिसर विद्रूप…
सातारा-स्वारगेट रस्त्यावरील भारती विद्यापीठ हॉस्पिटल समोरील, कात्रज डेअरी चौक येथील मुख्य रस्त्यावर अशाच प्रकारे झाडे लावण्यासाठी करण्यात आलेल्या जागेवर गवत माजले असून, इतर परदेशी झाडे आले आहेत. कात्रज येथील राष्ट्रीय प्राणी संग्रहालयालगतच असलेल्या पदपथ व सायकल पथ यावर देखील देखील जंगली झाडे उगवी आहेत.
“सातारा स्वारगेट रस्त्यावरील कात्रज ते सद्गुरु शंकर महाराज मठ रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे व गवत काढण्याचे काम तातडीने करण्याचे आदेश दिले आहे तसे कामही सुरू झाले आहे लवकरच भुतरफा पद्धत शेजारील वाढलेली होती झाडी काढून स्वच्छ करण्यात येईल.” – सुरेखा भनगे-शिंदे, सहायक आयुक्त, धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय.