रांजणगाव गणपती, (वार्ताहर)- आंबेगाव- शिरुर मतदारसंघात रस्ते विशेष दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपये निधी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी दिली.
आंबेगाव शिरुर मतदारसंघात रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम,२०२३-२४ अंतर्गत भरीव निधी दिला आहे. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वर्दळीचे असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार मंजुरी घेण्यात आली आहे. मंजूर कामाचे तपशील पुढीलप्रमाणे- रांजणगाव गणपती ते देवाचीवाडी, १० लाख, शिक्रापूर पिंपळे खालसा हिवरे कान्हुर कवठे फाकटे चांडोह, रस्ता विशेष दुरुस्ती,
शिरूर ग्रामीण कर्डेलवाडी ढोकसांगवी पिंपरी दुमाला गणेगाव खालसा पिंपळे खा. मुखई करंदी, शिक्रापूर गणेगाव खालसा मलठण टाकळी हाजी जांबुत ते टाकळी हाजी ते वडनेरची विशेष दुरुस्ती, निमगाव सावा ते जांबुत फाकटे टाकळी हाजी आमदाबाद ते टाकळी हाजी ते तामखरवाडी, पुणे आळंदी, पारगाव तर्फे खेड घोडेगावमध्ये सुधारणा आदी कामांचा समावेश आहे.