सातारा – येथील अनुभव फिल्म क्लबच्यावतीने माय मराठी महोत्सव 2023 राजलक्ष्मी चित्रपटगृहात दि. 2 ते 5 डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी 9 वाजता आयोजित केला आहे. महोत्सवामध्ये क्लबचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, उपाध्यक्ष ॲड. गिरीश कुलकर्णी, सचिव राजभूषण सहस्त्रबुद्धे, सहसचिव अमित द्रविड, खजिनदार मकरंद जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या क्लबचे हे २५ वे वर्षे असून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवून जनजागृती केली जाते. यामध्ये उद्या सकाली ९ वाजता तिचं शहर होणं हा प्रथम चित्रपट दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रसिका आगाशे यांनी केले असून सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, हेमांगी कवी, छाया कदम या कलाकारांनी अभिनय केला आहे. हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही