पुणे – महापलिकेच्या शाळेचा सलग पाचव्या वर्षीही 100 टक्के निकाल

पुणे – आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरलेल्या महापालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शंभर टक्के निकालाचे हे पाचवे वर्ष आहे.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू केलेल्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलने यंदाही निकालात बाजी मारली आहे. एकूण 55 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सर्वांनी उत्तम गुण प्राप्त करीत स्कुलचे नाव उज्ज्वल केले आहे. सृष्टी चिंतल हिला 87 टक्के तर आदर्श दोंतुल 82.8 टक्के , प्रियंका मिसाळ 82.6 टक्के असे गुण मिळवून यश मिळवले आहे. यापूर्वी या शाळेतून जेईई-मेन्स मध्ये तसेच आयआयटीमध्ये विद्यार्थी टॉपर आले आहेत. तर “नासा’साठी विद्यार्थ्यांचीही निवड झालेली आहे. या यशाबद्दल आयुक्त सौरभ राव यांनी विद्यार्थ्यांने, शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.