सीबीएसई निकालात पुण्याची घोडदौड सुरूच

पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात पुण्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. शहरातील बहुतांश शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून, पुण्यातील शाळांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.

ज्ञान प्रबोधिनीचा 100 टक्‍के निकाल
ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचा निकाल 100 टक्के लागला आहे. स्पृहा सरनाईक ही विद्यार्थ्यांनी 98.2 टक्के मिळवून शाळेत पहिली आली. विद्यार्थ्यांच्या निकालाची सरासरी 92.05 आहे. एकूण 80 मुले परीक्षेला बसली होती. 61 विद्यार्थ्यांना 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तसेच, विखे-पाटील मेमोरियल स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे. आयुषी बर्वे ही विद्यार्थीनी 98.2 टक्के मिळवून शाळेत पहिली आली आहे. 146 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

भुकुम येथील संस्कृती शाळेचा निकालही 100 टक्‍के लागला आहे. केशवनगरच्या द ऑरबिस प्रशालेचाही 100 टक्के निकाल लागला. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 50 टक्के विद्यार्थ्यांनी 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवले. त्यात कवाना अंकलेकरने 96.6 टक्के गुणांसह प्रथम स्थान मिळविले आहे.

वानवडी येथील सिटी इंटरनॅशनल स्कूलचा निकाल 100 टक्‍के लागला आहे. जान्हवी रीशिकेश हिने 97.1 % गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. परीक्षेस बसलेल्या एकूण 84 विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थी 90 टक्‍क्‍यांच्या वर गुण मिळवून गुणवत्ता यादीत आले आहेत. 25 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवून शाळेचे नाव उंचावले आहे. तसेच 19 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जान्हवी रीशिकेश हिने गणितात 100 पैकी 100 गुण मिळवलेले आहेत.

लोकसेवा ई-स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के
लोकसेवा ई-स्कूलचा दहावीचा सीबीएसई बोर्डाचा 100 टक्के निकाल लागला असून 18 विद्यार्थ्यांना 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळाले आहेत. 18 विद्यार्थ्यांना 80 ते 85 टक्‍क्‍यांच्या दरम्यान गुण मिळाले आहेत. परीक्षेसाठी एकूण 54 विद्यार्थी बसले होते. एका विद्यार्थीनीला हिंदीमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले असून गणितात 98, विज्ञानामध्ये 98, इंग्रजीमध्ये 96 गुण मिळवून शाळेचे विद्यार्थी प्रथम आले आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, संचालिका निवेदिता मडकीकर, प्राचार्या रेणुका दत्ता व संयोजक वैशाली वैष्णव यांनी सर्व गुणवंतांचे अभिनंदन केले आहे.

गोयल गंगा स्कूल
गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलचा निकाल 100 टक्के लागला असून येथील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे. आदित्य खानोलकर याने या परीक्षेत सर्वाधिक 96.6 % टक्के संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या 114 विद्यार्थ्यांपैकी 82 टक्के विद्यार्थ्यांनी डिस्टींकशन मिळविले आहे. तर 42 विद्यर्थ्यांनी 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.

यंदाच्या वर्षापासून 80 परीक्षेचे गुण आणि 20 टक्‍के अंतर्गत अशी पद्धत सीबीएसई बोर्डाने लागू केली होती. त्यामुळे यंदा निकाल कमी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष निकाल कमी होण्याऐवजी वाढला आहे. शाळेचा विचार करता यापूर्वी विद्यार्थ्यांची सरासरी उत्तीर्णांची टक्‍केवारी 89 टक्‍के होती. यावर्षी मात्र 92 टक्‍क्‍यांवर गेली आहे. अर्थात, हा निकाल अनपेक्षित म्हणावा लागेल.
– मिलिंद नाईक, मुख्याध्यापक, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.