पुणे – पुणे पोलिस आयुक्तालयातील 214 रिक्त पदासाठी 2019 ची पोलिस शिपाई पदासाठीची लेखी परिक्षा 5 ऑक्टोंबर रोजी लेखी परिक्षा झाल्यानंतर पात्र उमेदवारांच्या मैदानी चाचणीला मंगळवारी (दि. 26) पहिल्यांदाच पोलिस भरती प्रक्रियेत लेखी परिक्षा अगोदर हो्ऊन नंतर चाचणी परिक्षा घेतली जात आहे.
शिवाजीनगर मुख्यालयाच्या ठिकाणी सुरू असलेल्या मैदाणी चाचणी परिक्षेच्या ठिकाणी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे व अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी भेट देत भरती प्रक्रीयेचा आढावा घेतला.