पुणे – दिवाळी सणानिमित्त पोलिस आयुक्त कार्यालयाकडून तात्पुरते फटाके विक्री परवाने देण्यात आले आहेत. 27 ऑक्टोबर ते 07 नोव्हेबंर या कालावधीसाठी हे परवाने असणार आहेत. दरम्यान या कालावधीत विक्रेत्यांना विदेशी मूळ फटाक्यांची विक्री करता येणार नाही. तशा सुचना देण्यात आल्या आहेत.
तसेच मुदत संपल्यानंतर फटाके अथवा सोभेच्या दारूची विक्री करता येणार नाही. शिल्लक राहिलेले फटाके अथवा साठा हा परवाना असलेल्या गोदामात किंवा घाऊक परवाना असलेल्यांकडे परत करणे आवश्यक असल्याचे देखील नियमावलीत म्हटले आहे.
आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्यापासून 10 मीटर अंतराच्या आत कोणत्याही प्रकराचे फटाके अथवा शोभेची दारू उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील एकाद्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. ज्या ठिकाणी तात्पुरत्या फटाका स्टॉलसाठी परवानगी देण्यात आली आहे, त्या ठिकाणी 50 मीटरच्या परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.