पुणे – आदेश देऊनही पुन्हा गुरुवारी पाणी बंद

शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पुरवठा

पुणे – येत्या गुरूवारी (दि. 30 मे) रोजी उपनगरांसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून, शुक्रवारी (31 मे) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, गुरुवारी पाणीपुरवठा बंद न ठेवता तो सुरळीत करण्याचे आदेश महापौरांनी काही दिवसांपूर्वीच दिले होते. मात्र, आता पुन्हा गुरुवारी पाणी बंद राहणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि नवीन होळकर पंपिंग येथील पंपिंग, स्थापत्य विषयक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करायची असल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळवण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग
पर्वती जलकेंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नंबर 42 व 46 (कोंढवा खुर्द), पर्वती टॅंकर भरणा केंद्र, पद्मावती टॅंकर भरणा केंद्र.
वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक इ.

चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध-बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड.

लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगररस्ता आदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)