हडपसर – कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या “लडकी हूँ लढ सकती हूँ, या आवाहनास प्रतिसाद देत हडपसर येथे अनेक महिलांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कॉंग्रेसला गौरवशाली परंपरा असून निष्ठावंतांना न्याय देण्याचे काम पक्षाकडून केले जाईल, असे आश्वासन माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी दिले.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील नियोजित प्रभाग क्र. 25 मधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला, यावेळी शिवरकर बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी नगरसेवक अभिजित शिवरकर, हडपसर ब्लॉक अध्यक्ष प्रशांत तुपे, महिलाध्यक्षा माया ढुरे, अल्पसंख्याक विभागाचे सुलतान खान, बाळासाहेब गोंधळे, यशवंत साळुंखे, शहर सरचिटणीस दिलीप तुपे, चंद्रकांत ससाणे, विजय जाधव, शहर संघटक इम्रान शेख, माळवाडी अध्यक्ष इंदिरा तुपे, किरण होले, राजू गोंधळे, प्रवीण शेवकर, रफिक इनामदार, अमित शेवते, मारुती वाडकर, राणी आरू, डॉ. सारिका आरू, माया ससाणे, संपदा शिंदे, श्रद्धा गायकवाड, नंदा हिंगणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश फुलारे यांनी केले. मेळाव्याचे आयोजन नितीन आरू, गणेश फुलारे, वैभव डांगमाळी, स्वप्नील डांगमाळी, बाळासाहेब हिंगणे यांनी केले.
हडपसर मतदारसंघाचा विकास कॉंग्रेसच्या माध्यमातून झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचे सर्व उमेदवार निवडून येतील. – उर्मिला नितीन आरू, पदाधिकारी