बावडा ग्रामपंचायत निवडणूक ः पद्मावती ग्रामविकास परिवर्तन पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद
इंदापूर – बावडा ग्रामपंचायत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक लागलेली असून, यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते तसेच शेतकरीे संघटनेचे नेते, यांनी एकत्र येत पुरोगामी व प्रागतिक विचाराचा पद्मावती ग्रामविकास परिवर्तन पॅनल पूर्ण क्षमतेने उभा केला आहे. प्रचाराचा प्रारंभ गुयुवारी (दि. 26) ग्रामदैवतांना नारळ फोडून झाला. यामध्ये नागरिकांनी पद्मावती ग्रामविकास पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील, फरजाना मुलाणी, अरुण घोगरे, सुरेश शिंदे, विजय गायकवाड, संग्राम पाटील, सुरेशनाना घोगरे, तुकाराम घोगरे, नंदकुमार गायकवाड, विद्यासागर घोगरे, रोहित चव्हाण, जालिंदर गायकवाड, धैर्यशील पाटील, पांडुरंग गायकवाड, महादेव घाडगे, कल्पना यादव, राणी होनमाने, बाळासाहेब तावरे, दत्तात्रय कुंभार, जोत्स्ना कांबळे, वर्षा पाटील, प्रकाश गायकवाड, विक्रमसिंह घोगरे, मनीषा जाधव, सविता साबळे, निलेश घोगरे, प्रियंका पवार, लक्ष्मण गायकवाड, सारिका कांबळे, अश्विनी कांबळे, विक्रांत घोगरे यांच्यासह बावडा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंडितराव पाटील म्हणाले, बावडा गावात गेल्या पन्नास वर्षांपासून, ज्यांच्या हातामध्ये गावकऱ्यांनी विश्वासाने सत्ता दिली. त्यांनी गावाचा विकास न करता स्वतःचा विकास केला. त्यामुळे गावातील जनतेसाठी मोठा असंतोष आहे. जनतेला गृहीत धरण्याचा धंदा या गावामध्ये चालला. त्यामुळे गावाच्या हिताचे निर्णय ग्रामपंचायतच्या कार्यालयात होण्यापेक्षा वाड्यात होऊ लागले. आगामी काळात हे निर्णय ग्रामपंचायतमध्ये होतील. सूत्रसंचालन विजयराव गायकवाड यांनी केले तर आभार संग्राम पाटील यांनी मानले.
पद्मावती ग्रामविकास परिवर्तन पॅनलच विजयाचा गुलाल उधळणार आहे. जनकल्याणाच्या नावावर स्वतःची खिसे भरण्याच्या अप्रवृत्तीला जनता जागा दाखवेल.
– प्रशांतराव पाटील,माजी सभापती