हिरडस मावळ – भोर तालुक्यातील महाड रोडलगत बागायती शेतीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिसावरे येथील श्री काळभैरवनाथ मंदिरातील देवाचे अंदाजे दोन किलो वजनाचे चांदीचे मुखवटे चोरट्यांनी पळविले. ही घटना शुक्रवार (दि.12) रात्री घडली.
सकाळी पुजारी मंदिरात पुजेसाठी गेले असता मुखवटे चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. गावकऱ्यांनी तात्काळ मंदिराकडे धाव घेतली. मुखवटे चोरीला गेल्याचे खात्री झाल्यानंतर भोर पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर तातडीने भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र पवार, अनिल हिप्परकर, सहकारी घटनास्थळी भेट दिली.
पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत. तंटामुक्तीचे अध्यक्ष एकनाथ बरदाडे म्हणाले की, सध्या मंदिरातील चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून मंदिर परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.