पुणे जिल्हा : भरदिवसा देवाचे मुकुट पळविले; काळभैरवनाथ व जोगेश्‍वरी मंदिरातील घटना

कापूरहोळ – सावरदरे (ता. भोर) येथील काळभैरवनाथ व जोगेश्‍वरी देवीच्या मंदिरातील 70 हजार रुपये किमतीचे दोन किलो वजनाचे चांदीचे मुकुट चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेले. भरदिवसा ही घटना घडल्यामुळे भोर तालुक्‍यातील मंदिराची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील मंदिरातील गाभाऱ्यांच्या दरवाजाचे कडीकोयडे तोडून चोरट्यांनी आता प्रवेश केला. यावेळी काळभैरवनाथ व जोगेश्‍वरी देवीच्या डोक्‍यावरील चांदीचे मुकुट त्यांनी भरदिवसा पळविले. सायंकाळी सहा वाजता दादासाहेब गुरव हे नेहमीप्रमाणे देवासमोर दिवा लावण्यासाठी मंदिरात गेले होते. त्यांना मंदिरातील गाभाऱ्यांचे कडीकोयडे तोडून काळभैरवनाथ व जोगेश्‍वरी देवींच्या डोक्‍यावरील दोन किलो वजनाचे मुकूट पळविल्याचे निदर्शनास आले.

चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांनी याची माहिती दिली. राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यावेळी घटनास्थळी हवेलीच्या उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांनी भेट घेऊन पाहणी केली. तसेच त्यांनी जलद गतीने तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल साबळे पाटील, हवालदार निवास जगदाळे, नाना मदने करीत आहेत.

तो तरूण कोण?
शुक्रवार (दि. 12) दुपारी दीडच्या दरम्यान मंदिराच्या बाहेर बजाज पल्सर गाडी लावून एक तरूण बसलेला होता. उन्हाची तीव्रता जादा असल्याने तो थांबला असेल, असे त्यावेळी ग्रामस्थांनी वाटले. परिसरातील शेतीच्या कामांत शेतकरी व्यस्त असल्यामुळे गावात बहुतांशी ग्रामस्थ शेतात असल्याचा फायदा घेऊन भरदिवसा चोरट्यांनी हे धाडस केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मंदिरासमोर बसलेला तो तरूण कोण, याचा पोलीस कसून तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.