पिरंगुट – लवळेफाटा (ता. मुळशी) येथे सिमेंट विटा वाहतूक करणारा ट्रक ब्रेक फेल झाल्याने मॉलमध्ये घुसला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून पौडच्या दिशेने सिमेंट विटा घेऊन ट्रक जात होता. पिरंगुट घाट संपताच ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. पुढे आल्यावर चालकाने ट्रक ऑक्सफर्ड मॉल मध्ये घातला.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकने वीज वाहक खांबाला धडक दिल्याने वीज खांब तुटला. तसेच मॉलमधील लोखंडी सुरक्षा जाळी व भिंतीचे नुकसान झाले आहे.