ग्रामसेवा पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
नारायणगाव – जुन्नर तालुक्यात नागरी आणि ग्रामीण पतसंस्था मोठ्या प्रमाणात सहकार क्षेत्रात काम करत अहे. पतसंस्थाना धोकादायक ठरणार्या कर्ज बुडव्याची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहेत. कर्ज बुडव्यांना चाप लावण्यासाठी तसेच कर्ज वसुलीसाठी 101च्या कारवाईची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी लवकरच विधानसभेत कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी म्हटले आहे.
धनगरवाडी (ता. जुन्नर) येथील जुन्नर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या ग्रामसेवा पतसंस्थेच्या 2024 च्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक बजरंग शेळके, अध्यक्ष इंद्रजित शेळके, उपाध्यक्ष मारुती शेळके, कुलस्वामी पतसंस्थेचे संचालक विजयनाना शेळके, सरपंच महेश शेळके, माजी सरपंच हनुमान शेळके, ट्रस्टचे अध्यक्ष विकास शेळके, पोलीस पाटील अजय राऊत, केशव नलावडे, बबू पारवे, मारुती शिंगोटे, नामदेव पाटोळे, भिकाजी शेळके,
ज्ञानेश्वर शेळके, संस्थेचे संचालक यशवंत शेळके, एकनाथ शेळके, चंद्रकांत शेळके, गोकुलदास शेळके, पंढरीनाथ साळुंखे, बन्सी कराळे, गौरव शेळके,विनोद शेळके,आशुतोष शेळके, अरुण शेळके, सखाराम शेळके,कुंडलिक पाटोळे, महेश शेळके, जयवंत शेळके, दिलीप शेळके, सौरभ शेळके, शशिकांत पवार, अनिकेत काशिद, अजय शेळके, अविनाश शेळके, दिनेश शेळके, गणपत शेळके, संदेश शेळके, सुरज शेळके, बाबुशेठ विधाटे, राजूशेठ गावडे, चंद्रकांत महांकाळ व सभासद उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी सावळेराम सोलाट, मनोरमा शेळके, शुभम शिंदे यांनी प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे नियोजन केले. संस्थेचे अध्यक्ष इंद्रजित शेळके यांनी संस्थेच्या कामकाजा विषयी माहिती देऊन सर्वांचे स्वागत केले, तर सरपंच महेश शेळके आणि सभासद जगन्नाथ शेळके यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव विलास शेळके यांनी तर संचालिका प्रियांका शेळके यांनी आभार मानले.