डॉ. स्वाती मुळे : विद्यार्थ्यांची किराणा भुसार, हॉलेमध्ये भेट
मंचर – पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञान घेतले पाहिजे.त्या माध्यमातून विद्यार्थी व्यवहारिकदृष्ट्या परिपूर्ण होण्यास मदत होईल, असे मत आई एज्युकेशनल सोसायटी संचालित शाळेच्या संस्थापिका डॉ. स्वाती मुळे यांनी व्यक्त केले.
न्यू ऑक्सफर्ड इंटरनैशनल स्कूल अवसरी/मंचर येथील इयत्ता 1 ते 4 थीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमावर आधारित मंचर येथील के. मार्ट किराणा भुसार मालाच्या विक्रीची तसेच 5 वी ते 9 वी विद्यार्थ्यांनी वडगाव फाटा येथील हॉटेल नटराजची भेट देऊन व्यवहारिक ज्ञानाची माहिती घेतली.
आई एज्युकेशनल सोसायटी संचालित अभ्यासक्रमाचा भाग म्हणून या उपक्रमात मुलांना माहिती देताना, शाळेच्या संस्थापिका डॉ. स्वाती मुळे म्हणाल्या, की मुलांच्या मनात हॉटेल व्यवसायाबद्दल कुतूहल असते. हॉटेल मॅनेजमेंट कसे चालते हे प्रत्यक्ष नटराज हॉटेलमध्ये नेऊन तेथील व्यवस्थापकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. हॉटेलचे मालक बाबाजी निघोट यांनी ही मार्गदर्शन केले.
क्षेत्रभेटीच्या निमित्ताने के. मार्ट मंचर येथे भेट देवून चिमुकल्यांनी मॉलमध्ये खरेदीचा आनंद घेतला. हिशोबाचे ज्ञान याक्षेत्र भेटीतुन मुलांना मिळाले. अवसरी शाळेचे मुख्याध्यापक प्रा. सचिन बोरकर, रांजणी (कारफाटा) शाळेच्या मुख्याधापिका सुनिता मुजुमदार, मंचर शाळेच्या उपमुख्याधापिका भारती महाजन, उज्ज्वला फल्ले व इतर शिक्षक वर्ग यांनी क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.