शेवगाव – कात्रज येथील आयसीई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तृतीय वर्षाचा निकाल नुकताच लागला. त्यात तालुक्यातील बालमटाकळी येथील सर्वसामान्य कुटुंबातील प्रथमेश बिरजू परदेशी या विद्यार्थ्याने ७४.६० टक्के गुण मिळवून घवघवीत असे यश प्राप्त केले आहे.
या यशाबद्दल प्रथमेश बिरजू परदेशी यांचे संघाचे जिल्हा कार्यवाहक सुरेश काजवे, हभ. शीतल महाराज देशमुख, राहुल महाराज देशमुख, माजी सरपंच अशोक खिळे, राम भिसे, अनिल परदेशी, योगेश परदेशी, हरून शेख, जयप्रकाश बागडे, इसाक शेख, अशोक गुंजाळ देविदास शिंदे, आबातात्या घोरपडे, सोमनाथ वैद्य, डॉ. अविनाश पुंडे यांच्यासह बोधेगाव परिसर प्रेस क्लब आदींनी प्रथमेश यांचे कौतुक केले.